असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम –
अर्ज दाखल करण्याचा कालावधी – 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
अर्जाची छाननी – 31 डिसेंबर
उमेदवारी माघारीची मुदत – 2 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम यादी – 3 जानेवारी 2026
मतदान – 15 जानेवारी 2026

एकूण जागा – 2869
महिला 1442
अनुसूचित जाती – 341
अनुसूचित जमाती – 77
नागरिकांचा मागास प्रवर्ग – 759
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीनंतर निवडणूक आयोग लगेचच पालिका निवडणुका जाहीर करेल असे अंदाज वर्तवले जात होते. दरम्यान पालिका निवडणुका जाहीर झाल्याने 21 जानेवारीला लागणाऱ्या निकालांना आता विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
मुदत संपलेल्या पालिका
31 जानेवारीच्या आधी निवडणुका घेण्यासंदर्भातील आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. राज्यातील 29 महापालिकांपैकी 27 महापालिकांची मुदत संपली होती. 5 पालिकांची 2020 मध्येच मुदत संपली होती. तसंच मुंबईसह काही पालिकांची 2022 मध्ये मुदत संपली होती. 2023 मध्ये 4 पालिकांची मुदत संपली होती अशी माहिती निवडणूक आयुक्त दिशेन वाघमारे यांनी दिली.
सहा महिन्यात जातवैधता सादर करण्याचे हमीपत्र द्यावं लागणार आहे. जातवैधता पत्र न देऊ शकणाऱ्यांची वैधता रद्द होईल. एकूण 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 मतदार असणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. मुंबई पालिकेसाठी 10 हजार 111 मतदान केंद्र असणार आहेत.
जी मतदारयादी वापरणार आहोत त्यासाठी 1 जुलै 2025 ही अधिसूचित यादी वापरली जाईल. ही मतदारयादी भारत निवडणूक आयोगाकडून घेतली असल्याने त्यात बदल करणे, डिलीट करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
मतदारयादीतील संभाव्य दुबार मतदारांची ओळख पटली आहे. त्यांच्या नावासमोर डबल स्टार असेल. त्यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आलं आहे. तसंच तो कोणत्या मतदार केंद्रावर मतदान कऱणार आहे यासंदर्भात विचारलं आहे. त्यांना तिथेच मतदान करण्याची परवानगी दिलं जाईल. ज्यांनी उत्तर दिलेलं नाही त्यांच्याकडून हमीपत्र घेतलं जाईल. स्टार कॅम्पेनरची संख्या 20 वरुन 40 करण्यात आली आहे.
मताधिकार मोबाईल अॅपच्या माध्यमातून नाव, प्रभाग आणि मतदान केंद्र याची माहिती मिळेल. हे अॅड्रॉइवर असून, आयओएसवरही आणलं जाणार आहे.
निवडणूक अधिकारी ठरले
राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांनी महापालिकांना निवडणूक अधिकारी आणि सहायक अधिकारी उपलब्ध करून द्यावेत, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला होता. त्यानुसार या अधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
29 महापालिका कोणत्या ?
एमएमआरडीए
1) मुंबई
2) नवी मुंबई
3) ठाणे
4) कल्याण डोंबिवली
5) वसई विरार
6) भिवंडी
7) पनवेल
8) मिरा भाईंदर
9) उल्हासनगर
पश्चिम महाराष्ट्र –
1) पुणे
2) पिंपरी चिंचवड
3) कोल्हापूर
4) सांगली
5) सोलापूर
6) इचलकरंजी
उत्तर महाराष्ट्र
1) नाशिक
2) अहिल्यानगर
3) धुळे
4) जळगाव
5) मालेगाव
मराठवाडा
1) छत्रपती संभाजीनगर
2) लातूर
3) नांदेड – वाघाळा
4) परभणी
5) जालना
विदर्भ –
1) नागपूर
2) अकोला
3) अमरावती
4) चंद्रपूर








